चाळीसगाव : महाविकास आघाडीच्या बाजूने कौल ?

ग्रा.पं.मतमोजणीच्या दोन फैर्‍याची मतमोजणी पूर्ण, जवळपास २८ गावांने निकाल लागले
चाळीसगाव :  महाविकास आघाडीच्या बाजूने कौल ?

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

चाळीसगाव तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीस सुरुवात झाला असून दोन फेर्‍याची मतमोजणी झाली असून तिसर्‍या पेरीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

दोन फेरीचे निकाल पाहता मतदारांनी महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार निवडुन आल्याचे बोलले जात आहे. तर बर्‍याच गावांमध्ये भाजपा पुरस्कृत उमेदवारी देखील नवडुन आले आहेत. निवडुन आलेल्या उमेदवारांनी आमदारांच्या कार्यालयात भेट देवून, विजोत्सव साजरा केला. भाजपा तसेच काही गावांमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत पूर्ण पॅनल आल्याची चर्चा आहे.

निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातून उमेदवारांसह कार्यकर्त्यानी शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे येथील परिसरास जत्रेसे स्वरुप आले आहे. विजय उमेदवारांना खांद्यावर घेवून समर्थ एकच जल्लोष करत, गुलालाची उधळण करुन, विजयोत्सव साजरा करताना, दिसून येत आहे.

मतमोजणीच्या एकूण ६ फेर्‍या पैकी निकालाच्या दोन फैर्‍या झाल्या असून तब्बल २८ गावांचे निकाल लागले आहेत. तर उर्वरित सर्व गावांचे दुपारी ३ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com