जळगाव जि.प
जळगाव जि.प
जळगाव

जि.प.शिक्षक बदल्यांचा उडणार बार

ऑफलाइन समुपदेशनाव्दारे बदलीप्रक्रिया राबविण्याचे केलेे नियोजन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशान्वये जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्या मंजूर टिपनीनुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑफलाइन बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे दि. 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

5 ऑगस्टपासून सकाळी 10 ते 6 वाजेदरम्यान जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात जिल्ह्यातील 836 शिक्षकांच्या बदल्यांचा बार उडणार आहे.प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या ऑफलाइन बदली प्रक्रिया समुपदेशनाने वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे.

त्यानुसार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता ग्रेडेड मुख्याध्यापक (मराठी, उर्दू माध्यम) विशेष संवर्ग शिक्षक भाग-1, विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 असे 47 तर पदवीधर शिक्षक उर्दू माध्यम विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 व 2 मधून 43 शिक्षक, तर उर्दू माध्यमातून 4 बदल्या करण्यात येणार आहे.

त्याच दिवशी दुपारी 2 ते 6 वाजता दरम्यान पदवीधर शिक्षक (उर्दू माध्यम) विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 व 2 मधून 43 शिक्षक तर दि. 6 रोजी सकाळी 10वा. ते दुपारी 1 वा.पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम), विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 व 2 नुसार 80 तर 6 रोजी दुपारी 2 ते 7 वाजता उपशिक्षक (उर्दू माध्यम) 100 शिक्षक बदली पात्र आहे.

7 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान उपशिक्षक (मराठी माध्यम) विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 व 2 मधून 81 तर दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान 76 शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडणार आहे.

दि. 8 रोजी सकाळी 10 ते दु.2 वाजता उपशिक्षक मराठी माध्यमातून अंतीम सेवा , ज्येष्ठता यादी क्रं 1 ते 100 उपशिक्षक तर दुपारी 3 ते 7 वाजता मराठी माध्यमातून उपशिक्षक 101 ते 200 तर 9 रोजी सकाळी 10 ते दु.2 वाजता उपशिक्षक मराठी माध्यमातून 201 ते 300 तर दुपारी 3 ते 7 वाजता 301 ते 410 उपशिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com