जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांची बदली

नूतन सीईओपदी डॉ.पंकज आशिया
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांची बदली

जळगाव - Jalgaon :

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांची अडीच वर्षात बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसे आदेश बुधवारी सायंकाळी मुंबई मंत्रालयातून देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्हा परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांना सध्या बदलीचे ठिकाण दिलेले नाही. दोन दिवसात त्यांना बदलीचे ठिकाण मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या रिक्त जागी भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांची नियुक्ती करण्याचे आदेश बुधवारी मिळाले आहेत.

डॉ.पाटील यांची कारकीर्द गौरवपूर्ण

सिईओ डॉ.बी.एन. पाटील यांनी कोरोनाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रे उत्तम रित्या सांभाळली. अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली मुंबई मंत्रालयातून करण्यात आली आहे.

त्यांनी जळगाव जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे स्वच्छता अभियाना अंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत पेपरलेस काम केल्यामुळे कोच पुरस्कार , अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला.

दरम्यान,डॉ. पाटील यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत ऑनलाइन संगणकीकरण काम केले. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची आँनलाईन हजेरी प्रणाली लागू करण्यात आली . ज्या गावांना पाणीपुरवठ्याची सोय नव्हती. अशा गावांना पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात त्यांना यश आले .अशा विविध प्रकारे त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com