पाचोरा क्वारंटाईन सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या
जळगाव

पाचोरा क्वारंटाईन सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या

अहवाल येणे अद्याप बाकी : परिसरात खळबळ

Ramsing Pardeshi

पाचोरा - प्रतिनिधी

तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील विनोद रमेश कोकणे या ३३ वर्षीय युवकाने काल दि.२१ जुलै रोजी साईमोक्ष क्वॉरंटाईन सेन्टर मध्ये रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या युवकास १९ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब देखील तपासणी साठी २० रोजी घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी रात्री ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे , तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे , पाचोरा न. पा.मुख्याधिकारी शोभा बावीस्कर ,डॉ.अमित साळुंखे यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भेट देत परीस्थीतीची पाहणी केली.

सदर युवकावर शासकीय प्रोटोकाल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. युवकाने आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आले नसले तरी या प्रकरणी जिल्हा पालक मंत्री, खासदार, आमदार, वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कोणाला ही पाठीशी न घालता कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी कारवाई होणे आवश्यक आहे. मयत हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दीड ते दोन वर्षांचा मुलगी व चार वर्षांची मुलगी व म्हातारे आई - वडील आहेत.

पाचोरा शहराबाहेरील वरखेडी रोडवर साईमोक्ष संशयीत कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. सदरचे सेंटर अधिग्रहीत केल्या पासुन क्वारंटाईन झालेल्या लोकांच्या सतत तक्रारी होत्या. यात प्रामुख्याने स्वच्छता, वेळो-वेळी डॉक्टर अथवा तज्ञ व्यक्तीच्या भेटी व तपासणी न होणे जेवण- नास्ता, पाणी यांच्या वेळेत अनिमीतता असणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वॅप घेतल्या नंतर त्याचा रिपोर्ट उशिरा प्राप्त होणे या सर्व बाबींना त्रस्त होऊन काही दिवसापुर्वी क्वॉरंटाईन लोकांनी जेवणावर बहिष्कार देखील घोषीत केला होता. त्यावेळी तातडीने प्रशासकीय यंत्रणेने भेटी देऊन तेथील क्वारंटाईन लोकांची समजुत देखील काढली होती.

Deshdoot
www.deshdoot.com