तलवार घेवून दहशत माजविणार्‍या तरुणाला अटक

रामेश्‍वर कॉलनीत एमआयडीसी पोलिसांची कारवाई
तलवार घेवून दहशत माजविणार्‍या तरुणाला अटक

जळगाव : Jalgaon

शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणार्‍या सागर पूनम कंडारे वय २४ रा. रामेश्‍वर कॉलनी या तरुणाला सोमवारी पहाटे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली आहे

(MIDC Police Station) एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे (Police Inspector Pratap Shikare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अनिस शेख, सुधीर सावळे, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, इम्रान बेग यांच्य पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com