जळगावातून १५ दुचाकी चोरणार्‍या तरुणाला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चोरलेल्या सर्व १५ दुचाकी हस्तगत
जळगावातून १५ दुचाकी चोरणार्‍या तरुणाला अटक

जळगाव - Jalgaon

शहरातून एमआयडीसी, शनिपेठ, शहर व जिल्हापेठ या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १५ दुचाकी चोरणार्‍या पारदर्शी उल्हास पाटील वय २० रा. पिंपळगाव बु. ता.जामनेर यास आज गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबूली दिली असून त्याच्याकडून चोरलेल्या सर्व १५ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्हयासह शहरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, उमेश गोसावी, वसंत लिंगायत, महेश महाजन, अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील पारदर्शी उल्हास पाटील हा तरुण जळगाव शहरात येवून दुचाकी चोरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाला. त्यानुसार पथकाने त्याला आज गुरुवारी अटक केली. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून सहा, जिल्हापेठ ७, जळगाव शहर पोलीस स्टेशन १ व शनिपेठ पोलीस स्टेशन एक अशाप्रकारे त्याने शहरातून १५ दुचाकी चोरल्याची कबूली दिली असून त्याने चोरलेल्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com