रावेर|प्रतिनिधी Raver

बऱ्हाणपूरहुन अमळनेरला गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या युवकास रावेर पोलिसांनी पकडले असून,त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

बऱ्हाणपूर येथून अमळनेर येथील साईम जानबाज बेलदार-वय २० हा मोटार सायकल क्रमांक एम.एच.३८ ई ८८१९ ने गावठी कट्टा नेत असल्याची माहिती रावेर पोलिसांना प्राप्त होताच,पोलिसांनी शहराबाहेर सापळा रचून साईम बेलदार याला पकडले,त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या पाठीवरील बॅगमध्ये एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस आढळून आले.

त्याला ताब्यात घेऊन रावेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे,या ठिकाणी कसून चौकशी सुरू केली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विठ्ठल देशमुख,गोपनीय विभागाचे पो.कॉ.मंदार पाटील,पुरुषोत्तम पाटील,पो. कॉ. प्रमोद पाटील,पो.कॉ. विशाल पाटील,पो. कॉ.कुणाल सोनवणे,पो. कॉ.महेश मोगरे यांनी केली.