वरणगाव फॅक्टरी, ता.भुसावळ । Bhusawal

वरणगाव आयुध निर्माणी वसाहतजवळ दर्यापूर शिवारातील अन्नपूर्णा नगरातील रहिवासी सिमरन भरत बोदडे या 21 वर्षीय युवतीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी 3 वाजता घडली.

याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेले माहितीनुसार सिमरन हिने दोरीने गळफास घेवुन जीवनयात्रा संपविली. तिचे लग्न ठरणार होते, आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.

याप्रकरणी मयत मुलीचे काका सेवानिवृत्त सैनिक रतन बोदडे यांनी दिलेल्या खबरीनुसार वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु रजि. नं. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत. फॅक्टरी परिसरात यापूर्वीही एका युवतीने आत्महत्या केली होती.