शिरसोली येथील तरुणाने गळफास घेत संपविले जीवन

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
शिरसोली येथील तरुणाने गळफास घेत संपविले जीवन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील शिरसोली येथील 32 वर्षीय जगदीश प्रल्हाद पाटील या तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेत आपली जीवनायात्रा संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जगदीश प्रल्हाद पाटील (वय 32) रा. भोद ता.धरणगाव ह.मु. शिरसोली हे गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शिरसोली येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्याला होते.

त्यांची पत्नी गेल्या आठ दिवसांपासून माहेरी गेलेली असल्याने ते घरी एकटेच होते. सोमवारी रात्री जगदिश यांनी घरात साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही बाब आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकिस आली.

दरम्यान सकाळी त्यांची बहीण सुनंदा शांताराम पाटील हे त्यांना उठवण्यासाठी गेले परंतु भाऊ झोपला असेल या विचाराने त्या तेथून शेतात कामाला निघून गेल्या.

मात्र दुपारी 2 वाजता घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा दरवाजा बंद दिसला त्यामुळे त्यांना शंका निर्माण झाली. त्यांनी तातडीने नातेवाइकांना बोलून दरवाजा उघडला तर भावाने घरात साडीने गळफास घेतल्याचे उघडकीला आले.

भावाचा मृत्यदेह बघताच बहिणीचा आक्रोश

भावाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसताच बहिणीने हंबरडा फोडला. याप्रकरणी तातडीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. मयत जगदीश पाटील यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, मुलगी जानू, मुलगा राज, दोन भाऊ असा असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com