शिरसमणी येथे तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू
जळगाव

शिरसमणी येथे तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

शॉक लागण्याची तालुक्यातील तिसरी घटना

Ramsing Pardeshi

पारोळा (श. प्र.) -

तालुक्यातील शिरसमणी येथील मुक्तार अकिल खाटीक (वय 25) हा आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याचे शिरसमणी येथील रहाते घरात जात असताना घराच्या पुढे पत्रा लावलेल्या अँगलला हात लावला असता त्या अँगलमध्ये करंट उतरलेले असल्याने मुक्तार यास शॉक लागून खाली कोसळला त्यास लगेच अशपाक खाटीक, संतोष महाजन,सुनील महाजन,सागर पाटील, प्रशांत महाजन,मुश्ताक खाटीक,पप्पू खाटीक यांनी खाजगी वाहनात टाकून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाँ योगेश साळुंखे, डॉ. राजेश वालडे यांनी तपासूनमयत घोषित केले. याबाबत युनूस गणी खाटीक यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर मयत आई वडिलांचा हा एकुलता एक मुलगा होता आणि अविवाहित असून मुक्तार हा बी एस सी पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याला गावातील तरुणांनी शिक्षणासाठी व पुस्तकांसाठी आर्थिक मदत करत होते.तालुक्यात जोगलखेडे,टोळी,नंतर आजची शिरसमणी ची घटना घडल्याने तालुक्यातील ही 3 री दुर्दैवी घटना घडली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com