धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद
file photo
file photo

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव-खरजई रेल्वे स्थानका दरम्यान तालुक्यातील खरजाई येथील २४ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज गणेश मराठे (वय-२४) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात चाळीसगाव ते वाघळी रेल्वे स्थानक खांब क्र. ३३०/२४ दरम्यान घडला असून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना शैलेश पाटील हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com