जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बाहेर फिरून येतो असे सागून घरातून निघलेल्या दापोरा येथील 27 वर्षीय तरूणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी विशाल शांताराम पवार (वय-27) हा तरूण आई व बहिणीसह वास्तव्यास आहे. शिक्षणासह आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावित होता.

विशालवर कर्ज असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. 29 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता बाहेर जावून येतो असे सागून दुचाकीने घराबाहेर पडला.

शिरसोली व दापोरे दरम्यानच्या परिसरात दुचाकी लावून त्याने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केली.

गँगमन पांडे यांनी तत्काळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तालुका आणि एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली.