गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील घटना
गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

पारोळा - प्रतिनिधी Parola

तालुक्यातील (Bhokarbari) भोकरबारी येथे अजितसिंग गनसिंग शिसोदिया वय-22 याने आज दि.11 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याच्या स्वत:च्या घराच्या छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली.

याबाबत राहुल तुकाराम पाटील वय 27 धंदा शेती राहणार भोकरबारी यांनी खबर दिली की आज दि.11 रोजी मी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घरी असतांना माझे काका गणसिंग संतोष पाटील यांनी आवाज दिला की, तुझा चुलत भाऊ अजितसिंग हा दरवाजा उघडत नाही असे सांगितल्यावर मी तसेच माझे काका व शेजारी राहणारे राकेश पंडीत बडगुजर, देविदास काशिनाथ बडगुजर व लहान भाऊ स्वपनिल तुकाराम पाटील असे घरी जावुन त्यास आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला नाही म्हणुन आम्ही दरवाजा तोडला असता भाऊ अजितसिंग गनर्सिंग शिसोदिया हा घराच्या छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

त्यास खाली उतरवुन पारोळा कुटीर रुग्णालय येथे खाजगी वाहनाने उपचाराकामी आणले असता तेथील डॉक्टरांनी अजितसिंग गनसिंग शिसोदिया यास 7.30 वाजता. तपासुन मयत घोषीत केले. सदर घटने बाबत (Parola Police) पारोळा पोस्टेला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत हे कॉ विनोद साळी हे पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com