वाळू व्यावसायिकाकडून बंदुकीने ठार मारण्याच्या भितीने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वाळू व्यावसायिकाकडून बंदुकीने ठार मारण्याच्या भितीने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

वाळू व्यावसायिकाने (sand trader) घरी येवून शेतमजुर तरुणाला पिस्तूलाच्या गोळ्या (Pistol bullets) झाडून ठार मारण्याच्या दिलेल्या धमकीने (Threat) घाबरलेल्या संदीप देवचंद सोनवणे(Sandeep Devchand Sonawane) (वय 31) या शेतमजुर (Farm laborer) तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील देऊळवाडा (Deulwada) घडली. विषप्राशनानंतर प्रकृती बिघडल्याने संदीपला जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

जखमी संदीप सोनवणे याचा भाऊ प्रदीप सोनवणे याने दिलेल्या माहितीनुसार असे की, देऊळवाडा येथे संदीप देवचंद सोनवणे हा तरुण आई, वडील, पत्नी, मुले तसेच भावासोबत वास्तव्यास आहे. कुटुंब शेतमजुरी करुन त्यावर त्यांचा उदनिर्वाह भागवितात. त्याच्या शेजारी चंद्रकांत सोनवणे राहतात. चंद्रकांत सोनवणे व त्यांचा पुतण्या मिथुन सोनवणे हे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दरम्यान वाळूच्या ट्रॅक्टरच्या प्रचंड आवाज होत असल्याने त्यामुळे घरात लहान मुले झोपत नाही. आवाजाचा त्रास होतो, म्हणून या मार्गाने वाळू वाहतूक करु नका असे संदीप सोनवणे हा चंद्रकांत सोनवणे व मिथुन सोनवणे यांना बोलला. याचा राग आल्याने मिथुन सोनवणे हा सकाळी साडेदहा वाजता संदीपच्या घरी गेला. संदीपला तसेच त्याची आई व वडीलांसह भावाला शिवीगाळ केली. आमच्या नांदी लागू नका, नाहीतर बंदुकीने गोळ्या झाडून ठार मारीन अशी धमकी मिथूनने संदीपला दिली.

धमकीमुळे घाबरलेला संदीप दिवसभर बाहेर

धमकीमुळे घाबरलेला संदीप हा दिवसभर त्याच्या मित्राच्या घरी लपून बसला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याच्या घरी परतला. घरात एकटा असल्याची संधी साधत त्याने जीवे ठार मारण्याच्या धमकीच्या भितीतून विषप्राशन करुन घेतले. अंगणात उभे संदीपचे वडील देवचंद हे घरात आले असता, त्यांना संदीपने फवारणीचे औषध प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या उपचार सुरु आहेत. घटनेनंतरही मिथुन सोनवणे हा घरी जावून शिवीगाळ करत असल्याची माहिती संदीपचा भाऊ प्रदीप सोनवणे याने बोलतांना दिली. तसेच आम्ही गरीब लोक आहेत, म्हणून भिती वाटते. त्याच्ंयावर कारवाई करा, असेही त्याने सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात गाठले. संदीप बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्याच्या भावाकडून माहिती घेतली. याप्रकरणी उशीरापर्यंत तालुका पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान घटनेने संदीपचे वडील तसेच भाऊ व कुटुंबिय कमालीचे धास्तावले आहेत.

तालुका पोलिसांच्या आशिर्वादाने चोरटी वाळू वाहतूक

दरम्यान मिथुन सोनवणे व त्याचे काका चंद्रकांत सोनवणे तापी नदीतून वाळूची चोरटी वाहतूक करतात. मात्र पोलिसांना आम्ही हप्ते देतो त्यामुळे आमचे पोलीसही काही वाकडे करु शकत नाही, असे मिथुन सोनवणे गाावात सांगत असल्याचेही यावेळी प्रदीप सोनवणे याने सांगितले.अवैध वाळु वाहतुकीनंतरही पोलीस तसेच महसूल विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचा आरोपही यावेळी प्रदीप सोनवणे याने बोलतांना केला. दरम्यान आठवडाभरात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.