यावल : पाटचारीत पडून दोन मुलांचा मृत्यू

यावल : पाटचारीत पडून दोन मुलांचा मृत्यू

यावल - Yawal - प्रतिनिधी :

येथील शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील राहणारी दोन लहान मुले पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्या बुडुन मरण पावल्याची दुदैवी घटना घडली.

या घटनेचे वृत कळताच शहरात एकच शोककळा पसरली आहे . दरम्यान काल मध्यरात्रीपासुन त्या पाटात बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात होता.

या संदंभात मिळालेली माहीती अशी की , यावल शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात सरस्वती विद्यामंदीर या शाळाजवळ राहणारा दिपक जगदीश शिंपी यांचा 12 वर्षीय गणेश बापु दुसाने वय14 वर्ष हा मुलगा हा आपल्या मित्रांसह यावल भुसावल मार्गावरील असलेल्या हतनुर पाटबांधारे विभागाची पाटचारी असुन , या पाटचारीत पुर्ण क्षमतेचे पाणी शेत पिकांसाठी सोडण्यात आले असुन , काल दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास येथील चार लहान मुलही पोहण्याच्या मोहात पडुन पाटचारीवर गेले होते.

त्यातील एक मुलगा हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो वाहुन जात असल्याचे पाहुन त्यास वाचविण्यासाठी गणेश बापु दुसाने याने एकास काठीच्या सहाय्याने वाचविलेपण तो पाण्यात पडुन मरण पावल्याची घटना घडली .

त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरड केली पण त्यांना मदत मिळु शकली नाही . त्यांना पाण्यात वाहुन जात असल्याचे पाहुन त्याला वाचविण्यासाठी या मुलांने मदत केली पण दुदैवाने पाण्यात प्रवाहाअधिक वेगाने असल्याने ती दोन मुले पडुन वाहुन गेल्याची दुदैवी घटना घडली.

त्यांचा शोध पाटाच्या पाण्यात आठ पट्टीच्या पोहणार्‍यांकडुन घेतला . दिनांक सहा मी रोजी दुपारी दोघा मुलांचे मृतदेह सापडले यांना यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले याप्रकरणी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू प्रकरणी यावर पोलिसात नोंद करण्यात आली आहे .

सदर घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून सध्या लोक डॉन मुळे शाळा कॉलेज महाविद्यालयांना सुट्टी आहे पाठाच्या प्रवाहामध्ये पाणी सोडलेले असून कोणीही मुलांनी होण्यासाठी त्यात जाऊ नये आपल्या मुलांची काळजी आई-वडिलांनी व नातेवाइकांनी घ्यावी जेणेकरून असे प्रकार टाळता येतील

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com