वड्री धरणात युवक बुडाला
जळगाव

वड्री धरणात युवक बुडाला

शोध न लागल्याने नातेवाईक माघारी

Ashish Patil

Ashish Patil

यावल - Yawal - प्रतिनिधी :

तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत लागून असलेल्या वड्री धरणात ४-५ मित्रांसह धरणात पोहण्यासाठी गेलेला वसीम फिरोज खाटीक (वय२०, रा. सावखेडा सीम) हा तरुण पाण्यात बुडाल्याची घटना २६ रोजी सायंकाळी घडली.

रात्रीपर्यंत धरणात त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान अंधारामुळे अडचण येत असल्याने नातेवाईकाना निराशेने घरी परतावे लागले.घटनेची माहिती मिळताच पं.स.सदस्य शेखर सोपान पाटील,व वड्री पो.पा. अतुल भालेराव, यावलचेे माजी नगरसेवक असलम शेख व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी धरणात पोहणार्‍या व्यक्तींना आणले दीड ते दोन तास खोल पाण्यात शोध घेतला मात्र युवकाचा शोध लागू शकला नाही. हे.कॉ. गोरख पाटील, असलम खान, निलेश वाघ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com