राहुल सोनवणे
राहुल सोनवणे|बामणोद
जळगाव

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

कारण गुलदस्त्यात

Ashish Patil

Ashish Patil

बामणोद - यावल - Jalgaon - Yawal - वार्ताहर :

येथील कोळी वाड्यातील रहिवासी राहुल प्रमोद सोनवणे (वय २१) या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कोळीवाड्यातील रहिवासी आणि भालोद महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कलाचा राहुल प्रमोद सोनवणे या तरुणाने दुपारी १२ वाजेच्या सुमारास भालोद-हिंगोणा रस्त्याने असलेल्या विष्णु वाघुळदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

राहुल याच्या आत्महत्येची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली आणि त्याचा मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपसरपंच दिलीप भालेराव, हे.कॉं. किरण चाटे, हे.कॉं. उमेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालय हलवला.

स्वभावाने शांत आणि आज्ञाधारक असलेल्या राहुल याच्या आत्महत्येने संपूर्ण बामणोद गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याबाबत फैजपुर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉं. किरण चाटे व हे.कॉ उमेश सानप करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com