ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू

ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू

मुलगी गंभीर जखमी : वाघळुद फाट्यावरील घटना

यावल - Yawal - प्रतिनिधी :

तालुक्यातील यावल- भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची तर युवती जखमी झाल्याची घटना 22 रोजी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुरेश सोनवणे (वय 45, रा. आव्हाणे) हे मुलगी मनिषा सुरेश सोनवणे (वय 19) हे दोघ यावलकडुन बोरावल मार्ग जात असतांना भुसावळकडुन यावलकडे येणार्‍या ट्रक क्र. जी. जे. 27 टीटी 4378 या चारचाकी मोटर वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघात सुरेश सोनवणे हे जागीच ठार झाले असुन त्यांची मुलगी मनिषा सोनवणे ही गंभीर जखमी झाली.

त्याच वेळी अंजाळे येथील धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीची तात्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात पहोचवले तिचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात औषधपचार करण्यात येवुन तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले.

मयत सुरेश सोनवणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार अजमल पठाण, विनोद खांडबहले, होमगार्ड पंकज फिरके यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला. सदर घटनेबाबत यावल पोलीसात आपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com