यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

१४ एप्रिल पासून होती होती बंद
यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्यासह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर-मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य (धुळे) हे राज्य शासनाच्या महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्णयानुसार खुले करण्यात आले आहे.

हे अभयारण्य कोरोना विषाणूबाबतच्या नियमांचे पालन करून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. असे वन्यजीव संरक्षक अ. मो. अंजनकर (नाशिक) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

ही अभयारण्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल, 2021 पासून पर्यटनासाठी बंद करण्यात आली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com