कामाचा ताण अन् नोकरीच्या भीतीतून मॅनेजरची आत्महत्त्या

तीन पानांची सुसाईट नोट लिहून संपविले जीवन
कामाचा ताण अन् नोकरीच्या भीतीतून मॅनेजरची आत्महत्त्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मुथ्थूट होमफिन इंडीया लिमिटेड या फायनान्स कंपनीच्या जळगाव शाखेच्या क्रेडीट मॅनेजर प्रदीप धनलाल शिंपी उर्फ कापुरे (45,रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा) यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 6 वाजता समोर आली आहे.

दरम्यान कापुरे यांनी आत्महत्येपूर्वी कंपनीच्याच तीन पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात गेल्या दीड वर्षापासून अतिरिक्त काम सोपविले. या कामासाठी वरिष्ठांचा दबाव, व काम केले नाहीतर नोकरी जाण्याची भिती या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

प्रदीप शिंपी हे पत्नी सुचीता, मुलगा कुणाल,मुलगी यज्ञा, आई सुमनाबई, भाऊ सुनील यांच्या मयुर कॉलनीत वास्तव्याला होते. रात्री कुटुंबाने जेवण केल्यानंतर साडे बारा वाजता सर्व जण झोपले. पत्नी सुचीता या सकाळी सहा वाजता उठल्या असता त्यांना मागच्या

खोलीत पतीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. पलंगावर तीन पानांची आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. दरम्यान, कुटुंबाने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरानी मृत घोषीत केले. तर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सुशील चौधरी, बारेला यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मी प्रदीप शिंपी हे 1 नोव्हेंबर 2017 पासून कंपनीत क्रेडीट मॅनेजर कार्यरत आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्याकडे अतिरिक्त काम सोपविण्यात आले होते. त्यात सोपविलेली जबाबदारी पार पाडत असतांना कामातील विविध अडचणींचा सामना करत असून गेल्या सहा महिन्यांपासून खूप हताश व निराश होतो.

त्यात वारंवार नोकरी जाईल असा धोका. खूप जबाबदारी, कमी मॅन पावर मध्ये खूप वेगवेगळे काम, कामाचा ताण व वरिष्ठांचा दबाव या अशा विविध अडचणींना कंटाळून मी स्वतः टोकाचे पाऊल उचलत आहे, मी आत्महत्या करीत आहे. असे शिंपी यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माझ्या कुटुंबाला जगण्याचे बळ द्या !

माझे पीएफ तसेच पेन्शनचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी माझे वरीष्ठ सहकार्य करतील, कंपनीची स्टाफ मेंबर सर्वांची माफी मागतो, खुपच स्ट्रेस झाल्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता, जळगाव ब्रांचसाठी खुप मेहनत घेतली.

माझे या मुथ्थूट होमकीन कंपनी व नोकरीवर खूप प्रेम आहे. माझे परिवार मला कधीच माफ करणार नाही, मात्र (कंपनीच्या वरिष्ठ, कर्मचार्‍यां उद्देशून) परिवाराला तुम्ही सर्व जगण्याचे बळ द्या, इतर फायदे की जे मला माहित नाही, ते मिळवून देण्यास सहकार्य करावे, वरिष्ठांनी माझ्या कुटुंबास वैयक्तिक आर्थिक सहकार्य करावे, मला ओळखणारे माझे सर्व सहकारी, मित्र यांनी माझ्या परिवारास सहकार्य व मागदर्शन करावे अशी मनापासून नम्र विनंती अशी परिवाराला मदतीसाठी भावनिक सादही सुसाईड नोटमधून प्रमोद शिंपी यांनी घातली आहे. तसेच यात वरिष्ठांचे संपर्क क्रमांकांसह स्वतःचा पॅनकार्ड नंबरही त्यांनी नमूद केला आहे.

वसुलीसाठी गेल्यावर तलवार काढून मारण्याची धमकी

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील गोसावी नावाच्या एका व्यक्तीने खोट्या कागदपत्राच्या आधारे 25 लाखाच्यावर कर्ज घेतले होते. या कर्जाची वसुलीसाठी प्रदीप शिंपी त्यांच्याकडे जायचे तेव्हा ती व्यक्ती तलवार काढून मारण्याची धमकी द्यायची, अनेक वेळा तेथे मारहाणही झालेली आहे.

गावातील लोक त्याच्या मागे काठ्या घेऊन सुटायचे. तर दुसरीकडे तुला त्या व्यक्तीकडून कर्जाची वसुली करावीच लागेल असे वरिष्ठ दबाव टाकायचे. यातून दिलासा मिळावा म्हणून आपण स्वत: 50 हजार रुपये भावाला दिल्याची माहिती प्रदीप शिंपी यांची बहिणी रेखा कमलाकर शिंपी यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com