नशिराबाद-भादली पुलाचे काम पूर्णत्वाकडे
जळगाव

नशिराबाद-भादली पुलाचे काम पूर्णत्वाकडे

राष्ट्रीय आपत्ती काळाचा सदुपयोग

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात राज्यातच नव्हे तर देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणी 23 मार्चपासून लागू करण्यात आली होती.

यादरम्यान लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करण्यात येऊन मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे जिल्ह्यातील भुसावळ, बोदवड, चाळीसगाव तसेच अन्य रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले.

यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. तर नशिराबाद-भादली दरम्यान असलेल्या एफओबी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत जळगाव जंक्शन स्थानकवरील जुना पादचारी पूल गेल्या वर्षभरापूर्वी काढला होता. त्यापासून काही अंतरावरच नवीन प्रशस्त अशा सहा मीटर रुंदीच्या पादचारी पुलाची निर्मिती केली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बोदवड स्टेशनवर 3.66 मीटर रुंदीचा एफओबी, चाळीसगाव, नांदगाव, देवळाली, घोटी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी एफओबी,पादचारी पुलाची उभारणीची कामे प्रगतीपथावर आहेत.
जीवन चौधरी,जनसंपर्क अधिकारी भुसावळ

जळगावसह भुसावळ यार्डात कामे

कोरोना राष्ट्रीय आपत्ती काळात दि.23 मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. याकालावधीत जिल्ह्यात भुसावळ मध्यरेल्वे विभागातर्फे जळगाव रेल्वेस्थानक, भुसावळ यार्ड, बोदवड, चाळीसगाव, नाशिक जिल्ह्यात नांदगाव देवळाली, तर विदर्भात अकोला,शेगाव,नांदुरा, मुर्तीजापुर,बडनेरा,अमरावती नवीन अमरावती, चांदुर बाजार, मलकापूर तर मध्यप्रदेशातील खंडवा आदी स्थानकांवरील कामांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com