पाच वर्षांपासून मोटारसायकली चोरणारे अट्टल महिला अन् पुरुष चोरटा गजाआड

२५ मोटारसायकली ताब्यात; महिला पुरुषाच्या वेशात करायची चोरी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दुचाकी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दुचाकी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सुमारे पाच वर्षांपासून मोटारसायकली लांबवणारे धरणगावातील पुरुष आणि अमळनेरातील महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. यातील महिला पुरुषाचा वेश परिधान करुन मोटारसायकली लांबवित होती, हे विशेष, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख हे सतत तीन ते चार दिवस चोरी करणार्‍या महिला व पुरुषाच्या मागे राहून नजर ठेवत होते. त्यांनी ते दोघं कशा प्रकारे मोटारसायकली चोरतात? याबाबत निरीक्षण केले. यातील हेमलता देविदास पाटील (वय ३४, रा.खड्डाजीन समोर, अमळनेर) ही महिला पुरुषाचा वेश परिधान करुन मोटारसायकलची चोरी करायची. तिला पुरुषाच्या वेशात मोटारसायकल चालविणे सोपे होते. ती महिला मोटारसायकल सुसाट वेगात चालविण्यात पारंगत आहे.

तसेच तिचा साथीदार निवृत्ती ऊर्फ छोटू सुकलाल माळी (वय ४८, रा.मोठा माळीवाडा, धरणगाव) हा सुमारे १० ते १५ फूट अंतरावरुन उभा राहून मोटारसायकलच्या मालकावर लक्ष ठेवायचा, हे पोलिसांच्या निरीक्षणात स्पष्ट झाले.हेमलता पाटील हिने मोटारसायकल लांबविल्यानंतर काही अंतरावर उभा असलेला तिचा साथीदार निवृत्ती ऊर्फ छोटू सुकलाल माळी यास ती महिला तिच्या मागे बसवून ते दोघं चोरीचे वाहन लंपास करीत होते. तसेच तिचा साथीदार निवृत्ती ऊर्फ छोटू सुकलाल माळी (वय ४८, रा.मोठा माळीवाडा, धरणगाव) हा सुमारे १० ते १५ फूट अंतरावरुन मोटारसायकलच्या मालकावर लक्ष ठेवायचा, हे निरीक्षणात स्पष्ट झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना अटक केली. तपास कामी दोघांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयात हजर केल असता त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.चोरीच्या मोटारसायकली निवृत्ती माळी धरगावसह इतर ठिकाणी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून मिळेल, त्या किमतीत विकत होता. हा विषय पोलिसांच्या कानावर आला. त्यानंतर त्यांनी सापळा रचला. या मोटारसायकली विकत घेणार्‍या व्यक्तींविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निरीक्षक बापू रोहम यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com