विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

दोन दिवसांपासून होती बेपत्ता
विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

पारोळा Parola - प्रतिनिधी

तालुक्यातील वेल्हाणे येथील ४५ वर्षीय महिला शेतात कामासाठी गेली होती, मात्र ती घरी परत आलीच नाही. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली ही महिला आज वेल्हाने शिवारातील एका विहीरीत आढळून आली. ती महिला....

गोराणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हल्ली मुक्काम वेल्हाने तालुका पारोळा येथून गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्या वेल्हाने शिवारातील शेतातून उडदाच्या शेंगा तोडून आणते असे सांगून गेली होती ती घरी आली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती आज दि.28 रोजी सकाळी साडेसहा वाजता वेल्हाने शिवारातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मिळून आली.

या महिलेचे नाव नाव ललिताबाई नारायण पाटील (वय 45) असे असून याबाबत पोलिस ठाण्यात विनोद हिरामण पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com