हिगोंणे येथे कारच्या धडकेत महिला ठार

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला एकाविरोधात गुन्हां दाखल
हिगोंणे येथे कारच्या धडकेत महिला ठार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील चाळीसगाव-भडगाव रोडवर हिगोंणे खु.गावाजवळ शौच्छास जात असलेल्या महिलेला चारचाकी कारने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ठगुबाई भालचंद्र चव्हाण (वय ५०)रा.हिगोंणे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला एकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

ठगुबाई भालचंद्र चव्हाण रा.हिगोंणे खु. ह्या या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शौच्छाहुन घरी जात असताना, चाळीसगाव-भडगाव रोडवरुन भरधाव येेणार्‍या चारचाकी कारने(क्र.एमएच.१९, बीपी,९७८८) त्यांना हिगोंणे गावाजवळ जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, ठगुबाई ह्या दुर अतंरावर फेकल्या गेल्या. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळावरुन चालकाने जखमी महिलेला कुठल्याही प्रकारची मदत न करता, तेथून पळ काढला, परंतू गावातील तरुणानी त्याचा पाठलाग करुन, पोलिसांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला भरत विनायक चव्हाण रा.हिगोंणे खु. यांच्या फिर्यादीवरुन कारचालक निलेश रविंद्र पाटील रा.बोरखेडा यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुन्दरडे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com