रावेर|प्रतिनिधी Raver

विवरा बुद्रुक (ता.रावेर) येथील पती-पत्नी चुलत काकाच्या उत्तरकार्यास मोटारसायकलीने जातांना, पाडळसा गावाबाहेर अचानकपणे झालेल्या अपघातात, मागे बसलेल्या पत्नीचा तोल जाऊन खाली पडताच डोक्याला व छातीला जबर मार बसून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली,हा दिवस विवरा येथील राणे परिवारासाठी काळा दिवस ठरला.

येथील गणेश राणे त्यांच्या पत्नी तृप्ती राणे (वय-३६) यांना सोबत घेऊन मोटार सायकलीने जळगांव येथे चुलत काकांच्या उत्तर कार्यास जात होते, पाडळसा येथील स्वराज ट्रॅक्टरच्या शोरूम समोर रस्त्यावर सकाळी ८ वा. रस्त्यावरील खड्यात मोटार सायकल आदळून पडल्याने, झालेल्या अपघात तृप्ती राणे गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व छातीच्या उजव्या बाजूला जोरदार फटका बसल्याने जागीच जीव सोडला.

तर गणेश राणे यांच्या देखील पायाला व डोक्याला दुखापत होवून ते जखमी झाले आहे. याबाबत फैजपूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून, यावल येथे डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले.यानंतर विवरा येथे साडेचार वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.तृप्ती राणे यांनी काही वर्ष आशासेविका म्हणून कर्तव्य बजावले होते.अतिशय मनमिळावू आणि हसतमुख स्वभाव असल्याने त्यांच्या दुर्दैवी निधनाने गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुली,सासू असा परिवार आहे.