विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथील घटना
 विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील बिलाखेड शिवरात शेतात निंदनीचे काम करीत असलेल्या महिलेला तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका महिलेच्या जागेवर मृत्यू झाला. तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोेलिसात नोंद करण्यात आली आहे.

बिलाखेड शिवरातील शेतात उषा रविंद्र कोळी (वय ३०) व मंगल संभाजी गायकवाड(२८) या दोन्ही महिला आज संकाळी( दि,११) निदनीच्या कामासाठी गेल्या होत्या. निंदनीचे काम करीत असतानाच विद्युत खंब्यावरील तुटलेल्या विजेच्या तारांचा त्यांचा स्पर्श झाला. यात उषा कोळी यांना जबर विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला, तर मंगल गायवाड या जबर जखमी झाल्या आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात असून मयत महिलेला महावितरणाकडून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com