विज खांबाचा शाॅक लागून गायसह महिलेचा मृत्यू

वराडसिम जोगलखोरी शिवारातील घटना
विज खांबाचा शाॅक लागून गायसह महिलेचा मृत्यू
विजेच्या खंबा जवळ महिलेसह मृत्यू झालेली गाय (छाया -जितेंद्र काटे)

सुनसगाव, ता. भुसावळ - वार्ताहर Bhusawal

येथून जवळच असलेल्या वराडसिम गृप मध्ये येणाऱ्या जोगलखोरी येथे दि २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजे च्या सुमारास जोगलखोरी शिवारात नरेंद्र विठ्ठलदास लढ्ढा ( गोटू मारवाडी ) यांच्या मालकीच्या शेतात लोखंडी विज खांबाखांबा (electric pole) जवळ गाय चारा खात असताना गायीला शाॅक लागला असता गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कमलबाई सुरेश पाटील यांनाही शाॅक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या लोखंडी विज खांबाला विज वाहतूकीच्या ताराचा लुप लागलेला असल्याने ही घटना झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मावळे यांनी सांगितले . तसेच नरेंद्र लढ्ढा यांची शेती विलास पाटील हे करतात त्यांनी दोन तीन वेळा हा विज खांबाला शाॅक लागत असल्याचे विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते असे सांगितले . तसेच येथील विज वितरण कंपनीच्या अभियंता यांना घटना सांगण्यासाठी फोन केला असता फोन उचलत नसल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.या ठिकाणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीसांना माहिती कळताच पोलीसांनी धाव घेल्याचे समजते.पुढील कारवाई पोलीस करीत असल्याचे समजते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com