महिलेची आजाराला कंटाळून आत्महत्या
जळगाव

महिलेची आजाराला कंटाळून आत्महत्या

रामेश्‍वर कॉलनीतील हनुमान नगरमधील घटना

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

रामेश्‍वर कॉलनीतील हनुमाननगरामधील एका महिलेने आजाराला कंटाळून मंगळवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मालूबाई जानराव अहिरे (वय ६५) या महिला दीर्घ आजारामुळे काही दिवसांपासून नैराश्यात होत्या. त्यांनी आजाराला कंटाळून गळङ्गास घेतला. ही घटना महिलेच्या मुलाच्या लक्षात आली.

महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.विसपुते यांनी खबर दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तपास उपनिरीक्षक गणेश कोळी, नाईक नीलेश भावसार आणि कॉन्स्टेबल संदीप धनगर करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com