पक्ष सोडून गेलेल्यांची दुर्गतीच

भाजपनेते आ. आशिष शेलार यांचा टोला
पक्ष सोडून गेलेल्यांची दुर्गतीच

जळगाव : Jalgaon

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत टीका टिपण्णी करणार नाही. परंतु भाजप सोडून गेलेल्यांची दुर्गतीच झाली असा अप्रत्यक्ष टोला भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, जो चोरी करतो, त्याच्या मागे ईडी लागते असे विधानही त्यांनी यावेळी केले.

भाजपचे नेते आ. आशिष शेलार हे बुधवारी खान्देश दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि महानगरपालिकेतील ३० नगरसेवक हे भाजपला सोडून गेलेत. याबाबत आ. शेलार यांना विचारले असता, खडसेंवर काहीच बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे जो चोरी करतो, त्याच्या मागे ईडी लागते हे सांगायला ही ते विसरले नाहीत.

भाजपचे नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे सध्या स्थानिक पक्षाच्या बैठकांमध्ये किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना दिसत नाही. याबाबत विचारणा केली असता, आ. शेलार म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. कोकणातही ते पूरग्रस्तांना मदत करायला गेले होते. खच्चीकरण करण्याचा काही प्रश्‍नच उद्भवत नाही. आम्ही सामूहिक नेतृत्वात काम करीत असल्याचे शेलार म्हणाले.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, प्रदेशउपाध्यक्ष बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, आ. संजय सावकारे, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, चंदू महाजन, पोपटतात्या भोळे, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

कोकणातही ते पूरग्रस्तांना मदत करायला गेले होते. खच्चीकरण करण्याचा काही प्रश्‍नच उद्भवत नाही. आम्ही सामूहिक नेतृत्वात काम करीत असल्याचे शेलार म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, प्रदेशउपाध्यक्ष बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, आ. संजय सावकारे, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, चंदू महाजन, पोपटतात्या भोळे, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com