जळगाव : विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू

सिंधी कॉलनीजवळील घटना
जळगाव : विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विजेच्या तारांना अडथळा निर्माण करणार्‍या झाडांच्या फांद्या तोडताना कंत्राटी वायरमन शेख कादर शेख अमीर (वय ३५, रा. नशिराबाद ह.मु. तांबापुरा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीजवळील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या मागील परिसरात घडली.

कंत्राटी वायरमन शेख कादर शेख अमीर हे ११ केव्हीए डीपी जवळील झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी ११ केव्हीए डीपीवरील वीजपुरवठा बंद होता. परंतु, थोड्याच अंतरावर ३३ केव्ही क्षमतेची डीपी आहे. झाडाची फांदी तोडत असताना ३३ केव्हीएवरील डीपीवर ती पडली आणि शेख कादर यांना शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. वायरमनच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com