जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या प्रादुर्भावामुळे परमिट रुम चालकांनी राज्य उत्पादन शुल्कात 50 टक्के सुट मिळावे यासाठी जिल्हधिकार्यांना निवेदन दिले होते.

शासनाने त्यांची मागणी मान्य करीत यंदाच्या वार्षीक शुल्कात सुट देत त्यांची मागणी मान्य केली असून याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर उद्योगधंद्यांवर ज्याप्रमाणे परिणाम झाला त्याच प्रमाणे जिल्हाभरातील सुमारे 450 परमिट रुमचालकांवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. जिल्हाभरातील परमिट रुम गेल्या एप्रिल महिन्यापासून सुमारे सात महिने बंद होते.

ज्याप्रमाणे इतर उद्योग धंद्यांना शासनाकडून करात सुट देण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काकडून आकारण्यात येणार्या वार्षीक शुल्कात 50 टक्के सुट मिळावी याबाबत जळगाव जिल्हा रिटेल वाईन व असोसिएशनने जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे शिफारस केली होती.

त्यानंतर देखील अनेक परमिट रुम चालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची वर्षभरासाठी लागणारी वार्षीक शुल्क भरले आहेत. परंतु आज शासनाने असोसिएशनची मागणी मान्य केली आहे.

पुढच्या वर्षीच्या शुल्कातून होणार कपात

अनेक परमिट रुम चालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे भरले जाणार्या वार्षीक शुल्क भरले आहे. परंतु 50 टक्के शुल्क कपातीचा निर्णय जाहीर झाला आहे. यात ज्या परमिट रुम चालकांनी शुल्क भरले आहे. त्यांच्या शुल्काची 50 टक्के रक्कम ही पुढच्या वर्षीच्या शुल्कातून वजा केली जाणार असल्याचे आदेश प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी काढले आहेत.

अन् वाढीच्या मागणीलाही यश

दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वार्षीक शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ होत असते. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे आर्थिक मंदिचे सावट निर्माण झाले असल्याने वार्षीक शुल्कातील वाढ झाली नसून ही मागणी देखील शासनाने मान्य केली आहे.