Video गिरणा धरण दहाव्यांदा गाठणार शंभरी ?

धरण ९५ टक्के भरले, येत्या २४ तासात धरणाचे दरवाजे उघडणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Video गिरणा धरण दहाव्यांदा गाठणार शंभरी ?

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

जळगावसह तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरणा परिक्षेत्रात झालेल्या दमदार पावासामुळे गिरण धरण आज ९५ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने येत्या २४ तासात धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच...

धरण परिक्षेत्रात असा पाऊस सुरु राहिला तर अवघ्या काही तासांमध्ये धरण शंभर टक्के भरण्याची दाट शक्यता असून तब्बल दहाव्यांदा शंभरी गाठणार आहे. धरण शंभरीकडे वाटचाल करीत असल्यामुळे यंदा तीन जिल्ह्यांचा पाणी प्रश्‍न मिटला आहे.

चाळीसगाव, मालेगाव, भडगाव, पाचोरा या चार तालुक्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरण परिक्षेत्रात झालेल्या दमदार पावासामुळे गिरण धरण आज ९५ टक्के भरले आहे. नाशिक जिल्ह्यातील हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा ही धरणे पूर्णपणे भरलेली असल्याने ठेंगोडा, हरणबारी आणि चणकापूर या तिन्ही धरणातून ५०० ० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज दुपारपर्यंत गिरणा धरणात २०४३६ द. ल. घ. फू. म्हणजेच ९४.२५ इतका जिवंत पाणीसाठा निर्माण झाले आहे. धरणात येणारे पुराचे पाणी तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा व गिरणा धरणाच्या परिचलणाचा आढावा घेऊन येत्या २४ तासात गिरणा धरणातून वाढीव पुराचे पाणी गिरणा नदीत सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनूसार उडण्यात येणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पुर येण्याची शक्यता असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशार दिला आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिला तर धरणात अवघ्या काही तासांमध्ये शंभर टक्के पाणी साठ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने येत्या २४ तासात धरणातून कुठल्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन करतो.

हेमंत पाटील, अभियंता पाटबंधारे विभाग

५० वर्षांच्या इतिहासात दहाव्यांदा शंभरी गाठणार?

गिरणा धरण हे ५० वर्षापूर्वी म्हणजेच १९६९ साली बांधले गेले. त्यानंतरच्या इतिहासात आजपर्यंन्त दहावेळा हे धरण शंभर टक्के भरणार आहे. १०० टक्के पाणी क्षमतेने भरलेल्या गिरणा धरणाची वर्षे पुढील प्रमाणे.-६ ऑक्टोबर १९७३, २१ ऑगस्ट १९७५, २६ सप्टेंबर १९७६, २९ सप्टेंबर १९८०, ११ ऑक्टोबर १९९४, ६ ऑक्टोबर २००४ , २ ऑक्टोंबर २००५, २९ सप्टेंबर २००६, १५ सप्टेंबर २००७, १७ ऑक्टोबर २०१९ आता सप्टेंबर २०२० मध्ये अवघ्या काही तासांमध्ये धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com