चाळीसगावात वाळू चोरीबाबत राजकिय शांतता का?

एकही नेता वाळूचोरी विरोधात मोहित उघडत नाही, सभा,मेळावे नसल्यामुळे कार्यकर्ते वाळूचोरीत सक्रीय, कारवाई न झाल्यास स्वता: नदीपात्रात उतरणार आ.मगेंश चव्हाण,
चाळीसगावात वाळू चोरीबाबत राजकिय शांतता का?

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

कोरोना महामारीत अनेकांनी जीव गमावले आहेत. कोरोनामुळे जीव गेलेल्याकडे करोडोची संपत्ती असून देखील ती वेळेवर कामात आली नाही. यावरुन तरी मानव जातीने बोध घेतला पाहिजे. परंतू चाळीसगाव तालुक्यात संपत्ती जमविण्यसाठी पिसाळलेले काही जण अवैद्य वाळू चोरीत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय झाले आहेत. तालुक्यात कोरोनाचे भयावह चित्र असताना, दुसरीकडे वाळू चोरट्यांनी मात्र वाळू चोरीसाठी ही नामी संधी समजून मेहुणबारे व भोरस परिसरातून वाळू चोरीत अक्षरशा: कहर केला असून कोरोडो रुपयांची वाळू चोरी झाली आहे. विशेष म्हणजे वाळू चोरीत अनेक राजकिय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय असल्यामुळे, स्वता;ला तालुक्याचे नेतृत्व म्हणून घेणारे वाळू चोरीविरोधात गप्प असल्याने तालुक्यात वाळू चोरीविरोधात राजकिय शांतता का ?, राजकिय नेत्याचेच वाळू चोरीत हात हुतले नाही ना? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. आता प्रशासनाने कडक भूमीका घेवून राजकिय पुढार्‍यांना न जुमानता वाळू चोरट्यांविरोधात एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.

तालुक्यातील मेहुणबारे व भोरस परिसरातील गिरणा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून वाळू चोरांनी अक्षरशा: कहर केला आला. कोरोना महामारीमुळे महसूल प्रशासनास कारवाई करण्यात काही प्रमाणात अडचण निर्माण होत असल्यामुळे वाळू विरोधात मोहीम काही प्रमाणात थंड पडल्याने वाळू माफियांना उधान आले आहे. विशेष म्हणजे वाळू चोरीत सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी शामिल असल्याची चर्चा तालुक्यात आहे. त्यामुळे राजरोसपणे मिळेल त्या वाहनाद्वारे वाळू चोरून, ती चढ्या भावाने विकली जात आहे. कारवाई करणारी यंत्रणाच गायब व फुटीर झाल्याने गिरणा पात्रात वाळू चोरटेे बेभान झाले असून गिरणा नंदीपात्रातून करोडा रुपयांची वाळू चोरली जात आहे. पोलीस दरबारी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, आशानी वाळू चोरीत आता चांगलेच बस्तान बसवले आहे. गेल्या वर्षभरात महसूल प्रशासानकडून अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी १६५ वाहनावर कारवाई केली असून पोलीसात ८ गुन्हे दाखल केले आहेत. अवैद्य वाळू वाहतुक प्रकरणी तब्बल ६३ लाख ३७ हजार ६९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक वाळू विरोधात कारवाई चाळीसगाव तालुक्यात झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातून सर्वाधीक वाळू चोरी होत असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. दररोज लाखो रुपयांची वाळू मेहुणबारे व भोरस परिसरातून चोरली जात आहे. त्यामुळे आता वाळू चोरट्यांविरोधात महसूल प्रशासनाने थेट गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे, नाहीतर तालुक्यातील वाळूचे अधिकृत ठेके तरी देवून मोकळे व्हावे. तरच वाळू चोरीला आळा बसू शकेल.

पदाधिकारी व कार्यकर्ते वाळूचोरीत सक्रीय-

कोरोनाचा प्रकोप वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे सभा, मेळावे व राजकिय कार्यक्रम घेण्यावर बंदी आली आहे. त्यातच शासकिय यंत्रणा ढिली झाली आहे. याचा फायदा स्वता;राजकिय पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून घेणारे काही वाळू माफियानी घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून तर सायगावपासून ते बहाळ टेकवाडेपर्यंत वाळू चोरीने कहर केला आहे. रात्रंदिवस ओमनी, ट्रॅ्क्टर, बैलगाडी व इतर वाहनांद्वारे वाळू उत्खनन करून वाहतुक केली जात आहे. वाळू चोरांनी गिरणेचे काही दिवसांपासून वस्त्रहरण चालवले आहे. रात्रंदिवस गिरणा पात्रातून ठिकठिकाणी मिळेल त्या वाहनांमधून इतकी वाळू चोरी होत आहे की, गिरणेत जागो जागी वाळू चोरीमुळे खड्डे पडले आहेत. त्यातच नेमहीच दुर्लक्षित राहिलेल्या भोरस परिसरातून देखील वाळू चोरट्यांनी कहर केला आहे. यात एका राजकिय पदाधिकार्‍यांचा देखील समावेश आहे, तर वाळू चोरीत एक पक्षाला ‘ शुभ ’ ठरलेला नवतरुण पदाधिकारी देखील सद्या रात्र-दिवस घडाळ्याच्या काट्यावर वाळू चोरी करीत असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या लॉबींगसाठी नुकताच एका पक्षाचा तालुकाध्यक्ष तहसील कार्यालयात लॉबींगसाठी आल्याची चर्चा महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांमध्ये आहे. तर शहरातील निरढावलेला वाळू चोर ‘ छोटा चेतन ’ कमळाचे ब्रॉसलेट घालून गेल्या अनेक दिवसांपासून वाळू चोरीत सक्रिय आहे. त्यांच्यावर महसूल प्रशासन देखील कारवाई करुन थंकले असल्याची चर्चा असून महसूल प्रशासनात त्याचा दबदबा निर्माण झाला आहे.

वाळू चोरीबाबत नेते कोमात, कार्यकर्ते जोमात -

तालुक्यात शासनाने गिरणा पात्रात कुठेही वाळूचे लिलाव नसतांना देखील ही वाळू चोरी कुणाच्या आशिवार्दाने होत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. वाळू चोरीत काही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश असल्यामुळेच एकही नेता वाळू चोरीविरोध खुलेआम बोलण्यास तयार नाही, किवा वाळू चोरीविरोधात मोहिम उघडण्यास तयार नसलयाचे चित्र आहे. तसेच पर्यावरण प्रेमीनी देखील या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. भविष्यात जर नेत्यांची वाळू चोरीविरोधात ठोस भूमीका घेतली नाही, तर भोरस व मेहुणबारे परिसरात वाळूचा एक कणा देखील उरणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी अवैद्यधंदे बंद करणार असल्याची मेघ गर्जना आ.मंगेश चव्हाण यांनी केली होती. आमदार मंगेश चव्हाण प्रेरीत शिवनेरी फाऊंडेशन सद्या तालुक्यातील सिंचन क्षमात वाढविण्यासाठी एकीकडे चांगले काम करीत आहेत. परंतू दुसरीकडे गिरणेच्या अवैद्य वाळू उपशाबाबत आमदारांकडून प्रयत्न होताना आतापर्यत दिसले नाही. आ.मंगेश चव्हाण यांनी नुकतेच शेतकर्‍यांच्या विजेसाठी ज्याप्रमाणे आदोलन केले, त्याप्रमाणे वाळू चोरट्यांविरोधात आदोलनाची गरज तालुक्यात आहे.

तालुक्यात ठिकठिकाणी वाळूचे ढिग-

भडगाव व पाचोरा परिसरात वाळूचे लिलाव झाल्यामुळे सद्या तेथील वाळू चाळीसगावात अधिकृतरित्या येत आहे. अधिकृतच्या नावाखाली अनाधिकृत वाळूची चोरटी वाहतूक केली जात असून शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वाळूचे ढिग करुन ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आधिकृतरित्या वाळूचा धंदा करणारे काही व्यवसायीक अडचणीत आले आहेत. सद्या अवैद्य वाळूची साठवणूक करुन ठेवून ती पावसाळ्यात चढ्या दराने विक्री करण्यासाठी पुढील चार महिन्याचे अवैद्य वाळू विक्रीचे नियोजन आतापासूनच वाळू चोरट्यांनी करुन ठेवल्याचे बालेले जात आहे. त्यामुळे महसूल विभागाने आता अवैद्य वाळूचे ढिंगारे शोधून, त्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच महसूल, पोलीसातील काही आधिकारी, कर्मचारी व तोतया पत्रकार वाळू चोरट्यांकडून जिरीमिरी घेवून, अवैद्य वाळूचोरीला सहकार्य करीत असल्याचे खुलेआम वाळूचोरट्यांमध्येच चर्चा असून कोणाला किती पैसे देतो यांची लिस्टच त्यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. आता आशाचे मोबाईल नंबरवरील संपर्काची माहिती घेवून, कारवाईची गरज आहे. तर वाळू विरोधात प्रमाणिक वार्ताकण करणार्‍या पत्रकारांना वाळू चोरट्यांकडून धमकीचे संदेश दुसर्‍यांमार्फत दिले जात असून खोट्या गुन्हांमध्ये अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे आता या मुजोर झालेल्या वाळू चोरट्यांविरोधात एमपीडीए अंतर्गत गुन्हां दाखल करण्याची वेळ आली आहे, तरच वाळू चोरट्यांना जरब बसेल. यासाठी पर्यावरणप्रेमीनी देखील पुढाकार येवून ही मोहिम यशस्वी केली पाहिजे.

- अवैद्य वाळू चोरी संदर्भात मी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या आहेत. परंतू तरी देखील वाळूचोरी संदर्भात पोलीस व महसूल प्रशासनाने कडक कारवाई केलेली दिसत नाही. येत्या आठ दिवासात त्यांनी वाळू चोरट्यांविरोधात ठोस कारवाई केली नाही, तर मी स्वता; नदीपात्रात कारवाईसाठी उतरणार आहे.

मंगेश चव्हाण, आमदार

-अवैद्य वाळू चोरी विरोधात जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई चाळीसगाव तालुक्यात आम्ही केल्या आहेत. कोवीडमुळे मनुष्य बळाची कमतरता बासत आहे, त्यामुळे कारवाईसाठी मर्यादा येत आहे. तालुक्यात अवैद्य वाळू चोरी होत असल्याची सत्यता आहे. परंतू यापुढे कारवाईसाठी जादा पथकाची नेमणूक करुन, वाळू चोरट्याविरोधात कडक कारवाई करु.

लक्ष्मीकांत सातळकर, प्रातांधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com