आमदार मंगेश चव्हाण गप्प का ?

सोलर पिडीत शेतकर्‍यांचा सवाल? सोलर प्रकल्पाला भाजपाची उर्जा ?
आमदार मंगेश चव्हाण गप्प का ?

मनोहर कांडकेर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी-

तालुक्यातील शिवारपुर व बोढरे शिवारात उभ्या राहिलेल्या सोलर प्रकल्पासाठी शेतकर्‍यांची जमीन बेकायदेशिररित्या घेतल्या गेल्या आहेत. सोलर पिडीत शेतकरी गेल्या चार वर्षांपासून लढत आहेत. परंतु त्यांना न्याय मिळत नाही. आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतेच तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केले म्हणून जळगाव येथे विज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता खुर्चीला बांधून आक्रमकपणे आदोलन केले. या आदोलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली, मात्र गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील सोलर पिडीत शेतकरी न्यायासाठी लढत असताना आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता या शेतकर्‍यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना सोशल मीडीतून खुले आवाहन दिले असून आमच्यासाठी कधी आदोलन करणार ?, कधी मुंडण करणार ? असे प्रश्‍न उपस्थित केले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक चर्चा ऊत आला असून सोलर प्रकल्पात भाजपाच्या नेत्यांचा हात असल्यामुळे आमदार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतेच तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केले म्हणून जळगाव येथे विज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता खुर्चीला बांधून आक्रमकपणे आदोलन केले. या आदोलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली, मात्र गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील सोलर पिडीत शेतकरी न्यायासाठी लढत असताना आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता या शेतकर्‍यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना सोशल मीडीतून खुले आवाहन दिले असून आमच्यासाठी कधी आदोलन करणार ?, कधी मुंडण करणार ? असे प्रश्‍न उपस्थित केले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक चर्चा ऊत आला असून सोलर प्रकल्पात भाजपाच्या नेत्यांचा हात असल्यामुळे आमदार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

काय आहे ? नेमके प्रकरण -

गेल्या चार वर्षापासून कृती समितीच्या माध्यमातून पिडीत शेतकरी न्यायासाठी शासन दरबारी लढा देत आहेत. तत्कालीन फडणविस सरकारच्या राजकीय आश्रयाखाली जवळपास १२०० एकर शेतजमिनी बेकायदेशीर, गैरमार्गाने, कवडीमोल भावात जमिनी लाटून सोलर प्रकल्प थाटला गेलाचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. दिल्ली येथून बड्या नेत्यांच्या आदेशावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसने व फडणविसच्या आदेशावरून स्थानिक तात्कालीन लोकप्रतिनिधींनी प्रकल्पांच्या मालकांशी हितसबंध जोपासत त्यांना सर्वोतंपरी बेकायदा राजकीय आश्रय दिल्यामुळे शेतकर्‍यांना न्यायापासून वंचित राहावे लागले, आजही दिल्लीहून मदत मिळत असल्याने कारवाई लांबली जात असावी असा संशय शेतकर्‍यांना आहे. कारण मध्यंतरी ऐका बनावट खरेदी प्रकरणी जेबीएम सोलर कंपणीच्या मालकाला पोलीसांनी मुंबईहून अटक करून कोर्टात हजर केले होते. परंतू दिल्लीहून राजकीय दबाव आनून स्थानिक यंत्रणा कामाला लावली व ऐका दिवसातच कंपणीच्या मालकाला जामिन मिळवून दिले गेले. यासाठी तहसिलदार, प्रांतकार्यालयीन वेळ संपल्यानंतरही, काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. कारण जामिनसाठी ( सालोंसी ) तयार करीत होते, बनावट खरेदी प्रकरणात ऐका दिवसात जामिन मंजूर होणे शक्य नव्हते, कारण इतर सहआरोपी ताब्यात घेऊन चौकशी करणे पोलीसांना गरजेचे होते, परंतू भाजपा पक्षातील राजकीय नेत्यांचे पाठबळ या कंपन्यांना अदिपासून राहीले आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे भाजपाचेे लोकप्रतिनिधी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी कृती समितीचा आरोप आहे.

आ .मंगेश चव्हाण यांना शेतकरी कृती समितीकडून आवाहन-

आमदार मंगेश चव्हाण यांची शेतकर्‍यांप्रती असलेली तळमळ पाहता सोलर पिडीत शेतकर्यांकडे दुर्लक्ष का ? दोनवेळा मोठ्या आशेने पिडीत शेतकर्‍यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदने दिली आहेत, परंतू आमदारांनी साधी विचारपूस देखील केलेली नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणने आहे, आमदारावर आमचा आरोप नाहीये की, त्यांनी प्रकल्पाला मदत केली आहे, कारण त्यावेळचे आमदार हे विद्यमान खासदार ऊन्मेश पाटील होते खरे तर खासदारांने प्रकल्पाला पाठीशी घातले आहे, त्यात आमदार मंगेश चव्हाण यांचा सहभाग आतापर्यंत तरी आम्हाला कुठेही आढळून आलेला नाहीये, तर मग या प्रकरणी आमदार गप्प का आहेत ? ते भाजपा पक्षाचे आमदार जरी असले तरी पहीले ते शेतकरीपुत्र, आहेत त्यांना तर आता शेतकरीयोध्दा म्हणून संबोधले जात आहे, आमदार शेतकर्‍यासाठी हजार गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहेत, ते काही खुर्चीसाठी लाचार दिसत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसच्या राजकीय आश्रयाखाली हा बेकायदा सोलर प्रकल्प उभा राहीला आहे, तरी देखील आम्हाला विश्वास आहे की ऊशिरा का होईना आमदार लक्ष घालतील, असे कृती समितीचे म्हणने असून त्यासंदर्भातील पोस्ट त्यांनी सोशल मीडीयावर व्हायरल केली आहे.

शेतकर्‍यांच्या आवाहनाला आमदार प्रतिसाद देतील का?

तालुक्यातील सोलर पीडित शेतकर्‍यांचा प्रश्‍न हा थेट मंत्रालयापर्यंत पोहचला आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयडी समिती गठीत करण्याचे आदेश दिल्याची माहिती मध्यंतरी धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल गोटे यांनी चाळीसगाव येथे पत्रपरिषद घेवून दिली होती. परंतू पुढे कोरोनामुळे एसआयटी समितीचे भिजत घोगडे पडले आहे. सोलर पीडित शेतकर्‍यांना विषय अतिशय गंभीर आहे. यात अनेक बड्या राजकिय नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे हे प्रकरण हातळ्यास अनेक राजकिय पुढार्‍यांचे हात थरथरत आहे. तालुक्याचेे आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतेच शेतकर्‍यांसाठी आक्रमण आदोलन करुन, स्वता;ला ‘ शेतकरी योद्धा ’ ही उपाधी लावून घेतली आहे. सोलर पीडीत शेतकर्‍यांची देखील त्यांच्याकडुन अपेक्षा वाढल्या आहेत. आणि आमदार मंगेश चव्हाण हेच आपल्याला न्याय देवू शकतील म्हणून त्यांनी थेट त्यांना आवाहन दिले आहे. त्यामुळे आता सोलरपीडीत शेतकर्‍यांचा आवाहनाला आमदार प्रतिसाद देतील का ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. जर त्यांनी सोलर पीडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला, तरच त्यांना ‘ शेतकरी योध्दा ’ म्हणने योग्य ठरले अशी देखील चर्चा सोलरपीडीत शेतकर्‍यांमध्ये आहे.

आमदारांची शेतकर्‍यांप्रती तळमळ पाहता, त्यांनी सोलर पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून देेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही दोन वेळा त्यांना निवेदन दिली आहेत. परंतू अद्याप त्यांच्याकडुन कुठल्याही प्रकारचे पाऊल उचले गेले नाही. त्यामुळे सोलरपीडीत शेतकरी, वेगळे आहेत का? असा प्रश्‍न आमच्या मनात निर्माण झाला असून आमदारांनी त्वरित आम्हाला न्याय मिळवून द्यावा.

भिमराव राठोड, शेतकरी कृती समिती

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com