दीपक गुप्तांनी  राज्यपालांची का घेतली भेट

दीपक गुप्तांनी राज्यपालांची का घेतली भेट

क्षेत्र सभेबाबत काय केली मागणी

जळगाव- Jalgaon

नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी मनपा हद्दीत नगरसेवकांनी क्षेत्र सभा Area meetings by corporators घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.मात्र अंमलबजावणी केली जात नाही. त्यापार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता Deepak Gupta यांनी गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांची भेट घेवून क्षेत्र सभेची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.

मनपा हद्दीत नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात सहा महिन्यातून एक क्षेत्र सभा घ्यावी.दोन वर्षात चार क्षेत्र सभा घेण्याबाबत २००९ मध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. मात्र अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून चर्चा केली.क्षेत्र सभेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यशासनाची आहे.

त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घ्यावी असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. क्षेत्र सभेसंदर्भात २०१४ मध्ये गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठातदेखील याचिका दाखल केली होती.


गुप्ता यांनी नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दाखल केली होती याचिका
क्षेत्र सभेबाबत दीपक गुप्ता यांनी मनपातून माहिती अधिकार कायद्यार्तंगत माहिती मागविली होती.त्यानंतर क्षेत्र सभा न घेणार्‍या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी देखील केली होती. त्या

नंतर गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यानुसार नगरविकास विभागाने विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागविला होता.क्षेत्र सभेबाबत तरतूद करण्यात आली असली तरी अद्याप पर्यंत अधिनियम अंमलात आलेला नसल्याने अपात्र करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असा अभिप्राय देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com