विषप्राशन केलेल्या विटनेरच्या तरुणाचा  मृत्यू

विषप्राशन केलेल्या विटनेरच्या तरुणाचा मृत्यू

तब्बल १८ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज ठरली अपयशी

जळगाव-jalgaon

तालुक्यातील विटनेर (Vhitner) येथील सुनील जगदेव बोबडे (Sunil Jagdev Bobade) (वय ४०, रा.विटनेर, ता.जळगाव) या तरुणाने शेतात विषप्राशन (poisoning) केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी घडली होती. जिल्हा रुग्णालयात (district hospital) उपचार (Treatment) सुरु असतांना मंगळवारी पहाटे १ वाजता सुनील बोगडे यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान त्यांनी विषप्राशन का केले होते, त्याचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात(MIDC Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटनेर येथे सुनील हा त्याची आई रुख्माबाई व मोठा भाऊ राजू यांच्यासोबत वास्तव्यास होता. त्याच्याकडे स्वत:ची दोन एकर शेती आहे. सुनील याने १० सप्टेबर रोजी शेतात विष प्राशन केले होते. पोलीस पाटील डॉ. साहेबराव धुमाळ यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

उपचार सुरु असतांना सुनील बोबडे यांचा मंगळवारी पहाटे एक वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मध्यरात्री मृत्यू झाल्यानंतर हवालदार सचिन मुंढे व नाना तायडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स्वप्नील पाटील, हेमंत पाटील व प्रदीप पाटील करीत आहे.

Related Stories

No stories found.