घरासमोर लघुशंका केल्याचा जाब विचारताच डोक्यात टाकला लोखंडी रॉड
Crime

घरासमोर लघुशंका केल्याचा जाब विचारताच डोक्यात टाकला लोखंडी रॉड

पिंप्राळा शिवारातील गिरणा पंपिंग परिसरातील घटना

जळगाव : Jalgaon

घरासमोर पत्ते खेळून तेथेच लघू शंका करणार्‍यांना जाब विचारल्याचा राग आल्याने राजू भगवान देशमुख (४२) यांना तिघांनी बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी पिंप्राळा शिवारातील गिरणा पंपिंग रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तू कोळी, विक्की कोळी व भारत संजय सपकाळे (सर्व रा. गिरण्या पंपिंग रोड) राजू देशमुख यांच्या घरासमोर पत्ते खेळताना, तेथेच वाहने लावतात व लघू शंका करतात यामुळे त्रस्त झालेल्या देशमुख यांनी तिघांना जाब विचारला असता दत्तू व विक्की कोळी या दोघांनी देशमुख यांच्या पाठीवर लोखंडी रॉड मारला तर डोक्यात धारदार वस्तू मारुन दुखापत केली.

त्याचवेळी संजय सपकाळे याने डोक्यात बाटली मारली. यात जखमी झालेल्या देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गुरुवारी सकाळी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिवाजी धुमाळ करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com