ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

काशिनाथ पलोड शाळेचा उपक्रम : आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन शाळा
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कोरोनामुळे (Corona) गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद (School closed) होत्या. मात्र आता शासनाने इयत्ता आठवी ते दहावीच्या (Eighth to tenth) विद्यार्थ्यांची ऑफलाईन शाळा (Offline school) सुरु झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी काशीनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये(Kashinath Palod Public School) ढोल-ताशाच्या (sound of drums) गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत (welcomes students) करण्यात आले.

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील शाळा बंद होत्या.परंतु शासनाच्या आदेशानुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दि. 27 रोजी पासून शाळा सुरू करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांना तिलक लावून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

एकूण 338विद्यार्थ्यांपैकी 212 विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते .अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शाळेत आल्याचा, आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा आनंद आणि उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता.

शाळेची सुरुवात सरस्वती पूजन व प्रार्थनेने करण्यात आलीत्यानंतर शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Related Stories

No stories found.