विकेंड लॉकडाऊन : १८ लाखांची सिगारेट लपास

चाळीसगाव पोलिसात गुन्हां दाखल, सिगारेटसह सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर व सीपीयू चोरीस
विकेंड लॉकडाऊन : १८ लाखांची सिगारेट लपास
Robbery

चाळीसगाव Chalisgaon

याबाबत याबाबत सविस्तर वृत्त असे की सुरेश साबलदास रावलानी, रा. शांतीनगर. यांचे शहरातील पवन कॉम्प्लेक्स येथे नॅशनल टॅबको नावाने सिगारेटीचे दुकान आहे. दिनांक ९ रोजी ते आपल्या दुकानात विविध कंपनीच्या सिगरेट ठेवून नेहमीप्रमाणे घरी गेले, दरम्यान शनिवारी व रविवार असा दोन दिवस विकेंड लॉंकडाऊन असल्यामुळे ते घरीच होते,

दिनांक १२ रोजी ते नेहमीप्रमाणे दुकानात आले असता, दुकानाच्या कुलूप लावण्याच्या लोखंडी पट्ट्या तुटलेल्या लावण्या च्या लोखंडी पट्ट्या तुटलेल्या दिसल्या, त्यांना संशय आल्याने त्यांनी परिवाराच्या सदस्यास दुकानात जाऊन पाहिले असता विविध कंपनीच्या सिगारेट सीसीटीव्ही कॅमेरा डी व्ही आर व सीपीयू असा एकूण १८ लाख ३९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांना आढळून आले, त्यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठून याबाबतची माहिती दिली, या प्रकरणी रात्री उशिरा सुरेश साबदास रावलावणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलिस करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com