वाघूर धरणात जलपूजन

तांबे दाम्पत्याला दिला मान ; महापौर, उपमहापौर यांची उपस्थिती
वाघूर धरणात जलपूजन

जळगाव : (Jalgaon)

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले.

त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज गुरुवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गजानन मालपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणस्थळी मेहरुणमधील रहिवासी युवराज तांबे व वंदना तांबे या दाम्पत्याला जलपूजनाचा मान देण्यात आला. त्यानंतर तांबे दाम्पत्याने सपत्नीक साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व केमिस्ट श्यामकांत भांडारकर, विद्युत अभियंता विलास पाटील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी तांबे दाम्पत्यासह महापौर जयश्री महाजन यांनी वाघूर धरण (Waghur Dam) असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे (Waghur Dam) बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते तीन वेळा 100 टक्के भरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com