मारूळ येथील मुख्यमंत्री पेजल योजना रखडली

५१ लाख ३२ हजार ८३४ रुपये पाण्यात जाण्याची भीती : संबंधितांचे दुर्लक्ष
मारूळ येथील मुख्यमंत्री पेजल योजना रखडली

मारूळ ता यावल (सय्यद हजरत अली) Bhusawal

तालुक्यातील मारूळ येथे डिसेंबर २०१९ पासून मंजूर झालेली मुख्यमंत्री पेजल योजना अद्याप सुरू झालेली नसल्याने ही योजना रखडून यासाठी ५१ लाख ३२ हजार ८३४, रुपयांची निधी पाण्यात जातो की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.

मारुळ पासून तीन किलोमीटर अंतरावर मोर धरण आहे. या मोर धरणापासून मारूळ गावापर्यंत मुख्यमंत्री पेजल योजना अंतर्गत पाणीचा ट्यूबवेल करण्यात आलेली आहे. ट्यूबवेलपासून पाण्याची टाकी पर्यंत २०० मी.मी.ची. पीव्हीसी पाईप लाईन २८५० मीटर टाकण्यात आलेली आहे तसेच जलकुंभाची दुरुस्ती व कलरिंगकरण्यात आलेली आहे जलकुंभ लाही दुरुस्ती चांगल्याप्रकारे करण्यात येवून जलकुंभा लागत असलेले पाण्याचे पाईप बंद करण्यात आलेली आहे. तसेच ट्यूबवेलच्या शेजारी एक पंप घर ३०० मिटर, बांधण्यात आलेली आहे. मात्र आज पावेतो ट्यूबवेल सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे नेमके घोडे अडले कुठे हे समजू शकलेले नाही? ठेकेदारांचेचे बिल निघाले नाहीत का? वीज मंडळांनी आतापर्यंत कनेक्शन दिले नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करून काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com