जळगावातील पाणी पुरवठा एक दिवस उशिराने

जळगावातील पाणी पुरवठा एक दिवस उशिराने

जलवाहिनी गळती व विजवाहिनी दुरुस्तीचे काम

जळगाव : jalgaon

वाघूर धरणावरील विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तसेच मानराज मोटर समोरील १५०० मीमी व्यासाच्या पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे जळगाव शहरातील पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

वाघूर धरणाची Waghur Dam १५०० मीमी व्यासाच्या पाईपलाईनची गळती मानराज मोटार समोर झाली आहे. गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आली आहे. तसेच वाघूर धरणावरील Waghur Dam ३३ केव्ही वीजवाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे. दि. २ रोजी होणारा पाणी पुरवठा ३ रोजी होईल. दि. ३ रोजी होणारा ४ रोजी तर दि. ४ रोजी होणार पाणी पुरवठा दि. ५ रोजी होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने Municipal administration दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com