जळगाव - Jalgaon

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि.9 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8 वा. मोटारीने औरंगाबाद येथून चाळीसगावकडे प्रयाण, सकाळी 10 वा 30 ते 12.00 वाजता चाळीसगाव, जि.जळगाव येथे आगमन व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क रविद्र भैय्या पाटील, राजीव देशमुख, माजी आमदार) दुपारी 12.00 वाजता मोटारीने चाळीसगाव येथून धुळे शहराकडे प्रयाण.

गुरुवार, दि.11 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 10 वा 45 मि. नी. शिरपुर येथून पाडळसरे, ता.अमळनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा 30 ते 12.00 वाजता पाडळसरे, ता.अमळनेर येथे आगमन व निम्न तापी प्रकल्प भेट, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 12 ते 12 वा. 45 मि.नी अमळनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क- रविंद्र भैय्या पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील) दुपारी 12 वा 45 ते 2.00 वाजता पाडळसरे, ता.अमळनेर येथे राष्ट्रवादी परीवार संवाद. दुपारी 2.00 वा. पाडळसरे येथून अमळनेरकडे प्रयाण, दुपारी 2 वा 15 ते 3.00 वाजता अमळनेर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता अमळनेर येथून पारोळ्याकडे प्रयाण.

दुपारी 3 वा. 30 मि.नी पारोळा येथे आगमन (संपर्क- डॉ.सतिष अण्णा पाटील) दुपारी 3 वा 30 ते 4 वा 15 मि.नी एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 4.15 वा पारोळा येथून पाचोराकडे प्रयाण. सायं 5 वा 30 ते 6 वा 15 मि.नी पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क- दिलीप वाघ) सायं 6 वा 15 मि.नी पाचोरा येथून जामनेरकडे प्रयाण, सायं 7 वा 30 ते 8 वा 05 मि.नी जामनेर येथे आगमन व जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क - संजय गरुड) रात्री 8 वा. 15 मि. नी जामनेर येथून जळगावकडे प्रयाण, रात्री 9 वा. 15 मि.नी जळगाव येथे आगमन व मुक्काम.