वॉचनमनची रुमालाने गळफास घेवून आत्महत्या

अग्रवाल चौक परिसरातील घटना

जळगाव - Jalgaon :

शहरातील अग्रवाल हॉस्पिटल चौक परिसरातील रुग्णालयात काम करणार्‍या वॉचनमने त्याला राहण्यासाठी दिलेल्या खोलीत बागायती रुमालाने आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती.

शहरात राष्ट्रीय महामार्गालगत अग्रवाल चौक परिसरात अक्षय चेंबर येथे असलेल्या एका खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून हिरालाल मोतीलाल पारधी हे वॉचमन म्हणून कामाला होते.

सोमवारी सायंकाळी त्यांनी ते राहत असलेल्या खोलीत बागायती रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतला. प्रकाराची माहिती मिळाल्यावर याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविण्यात आले.

रामानंदनगर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविला होता. आज मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर आज मृतदेह नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आला.

दरम्यान हिरालाल पारधी यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण कळू शकलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com