हतनूर धरणातून पाणी सोडणार

जळगाव पाटबंधारे विभागाच्या सूचना
हतनूर धरणातून पाणी सोडणार

जळगाव - Jalgaon

आज दि.2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाणी वाढत असून धरणामधून (Tapi river) तापी नदी पात्रात पाणी सोडावे लागणार आहे.

तरी तापी नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांनी व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. नदीच्या काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, (Jalgaon Irrigation Department) जळगाव पाटबंधारे विभाग, जळगांव यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com