रा.प.महामंडळाच्या 173 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा आत्मदहनाचा इशारा

सेवेत सामावून न घेतल्याने उपासमारीची वेळ; उमेदवारांचा संताप
रा.प.महामंडळाच्या 173 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा आत्मदहनाचा इशारा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सन 2019 मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात सरळ सेवेने 173 उमेदवारांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या 173 प्रशिक्षणार्थी उमेदवारांपैकी 60 ते 70 जणांची फायनल टेस्ट झाली आहे.उर्वरित उमेदवारांची फायनल टेस्ट राहिली आहे. फायनल टेस्टसाठी प्रादेशीक व्यवस्थापकांकडे पत्रव्यवहार केलेला आहे.

भगवान जगनोर -विभाग नियंत्रक, रा. प. महामंडळ जळगाव

मात्र अद्यापही सेवेत सामावून घेत नसल्याने शुक्रवारी प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी संताप व्यक्त केला.दरम्यान,31 जुलैपर्यंत सेवेत सामावून न घेतल्यास 1 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा विभाग नियंत्रकांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत 2019 मध्ये 173 उमेदवारांची निवड झाली आहे.त्यानुसार उमेदवारांनी प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे.

तरीही संबंधित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सेवेत सामावून घेतले जात नसल्याने शुक्रवारी सर्व प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी जळगाव विभाग नियंत्रकांची भेट घेतली.

..तर 1 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन

प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सामावून न घेतल्याने उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे लवकरात लवकर सामावून घेण्याची मागणी विभाग नियंत्रकांना दिलेल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत सेवेत सामावून न घेतल्यास 1 ऑगस्टला नवीन बस स्थानकात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा समाधान पाटील, चेतन पाटील, राहूल पाटील, सोमनाथ बसे, शिवाजी पाटील, मनोज महाजन यांच्यासह प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com