करोनाची साखळी तोडण्यासाठी वॉर्डनिहाय भरारी पथके
जळगाव

करोनाची साखळी तोडण्यासाठी वॉर्डनिहाय भरारी पथके

फैजपूर नगरपालिकेने केले नियोजन

Rajendra Patil

फैजपूर, ता.यावल - प्रतिनिधी Faizpur

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फैजपूर शहरातही पुन्हा करोना डोक वर काढत आहे. विना मास्क फिरणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, विनाकारण गर्दी करणे, कोठेही थुंकणे या बाबी सर्रास दिसत आहेत. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने फैजपूर नगरपालिका प्रशासनाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

आदेशाचे पालन न करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे फैजपूर नगरपरिषद मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आवाहन केले आहे. चार सदस्यांसह पथक प्रमुख अशी रचना असून यात वार्ड नं एक व दोन साठी-प्रमुख विपुल साळुंखेसह नंदकिशोर कापडे, सुधीर चौधरी, दिपक सराफ, रमेश सराफ, वार्ड दोन, तिन व चारसाठी प्रमुख निलेश दराडे सह, दिनेश तेजकर, विलास सपकाळे, उल्हास चौधरी, प्रसन्न डोलारे, वार्ड क्र. पाच व सहासाठी प्रमुख दिलीप वाघमारे सह अविनाश चौधरी, हमीद तडवी, नरेंद्र बाविस्कर, हेमराज बढे, तर वार्ड क्र. सात व आठसाठी पथकप्रमुख बाजीराव नवलेसह तुळशीराम चौधरी, सुनील तायडे, सुहास नंदाणे, सुहास नेहते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com