आठवडाभर सूर्यदेवाचे दर्शन दुर्लभ

पर्जन्यमान। खरीप हंगामातील पिकांना जीवदान; शेतीच्या कामांना येणार वेग
आठवडाभर सूर्यदेवाचे दर्शन दुर्लभ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सुमारे पंधरा ते वीस दिवसांची दडी मारल्यानंतर गेल्या आठवड्याभरपासून पाऊसाला rain सुरुवात झाली आहे. दररोज पहाटेपासूनच पावसाची सरी Rain showers बरसत असल्याने आठवड्याभरात सुर्यदेवाचे दर्शन Darshan of the Sun God देखील दुर्लभ झाले आहे. दररोज पाऊस होत असल्याने बळीराजा Baliraja देखील आता सुखावला आहे.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पावसाअभावी शेतकर्‍याने जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. तर अनेक शेतकर्‍यांनी दुबार पेरणी देखील केली होती.

मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले होत. मात्र गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मान्सून पून्हा सक्रीय झाला आहे. दररोज रात्रीच्या सुमारास पावसाच्या मुसळधार सरी बरसत असून पहाटे पासुन दिवसभर पावसाची रिपरीप सुरुच असल्याने शेतकर्‍यांमध्ये देखील आता आनंदाचे वातवरण असून शेतीची कामांना देखील आता वेग आला आहे.

खतांसह शेतीच्या कामांसाठी उघडीप आवश्यक

आठवड्याभरापासून जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला असल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र आठवड्याभरापासून सुर्याचे दर्शन झाले नसून पिकांना आता खते देणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी पावसाची उघडीप होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास पिके अती पावसामुळे खराब होवू शकतात.

गेल्या आठवड्यात हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंजाद वर्तविण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वातावरणात देखील बदल झाला असून गारवा निर्माण झाल्याने असह्य होणारा उकाडा कमी झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com