विरवाडे पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात
जळगाव

विरवाडे पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात

तीन हजारांची मागणी पडली महागात

Rajendra Patil

जळगाव - प्रतिनिधी Jalgaon

चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील पोलिस पाटील महारू हरी कोळी जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले असून त्यांना पोलीस ठाण्यास माहिती न देणे व तीन हजाराची मागणी करणे महागात पडले आहे.

तक्रारदार (२५ वर्षीय तरूण) याचे एका मुलीशी प्रेमसंबंध असुन त्यांच्यात वाद निर्माण झाले होते, सदर प्रकरणाची माहीती पोलीस स्टेशनला कळविले तर गुन्हा दाखल होईल अशी सबब सांगून सदर प्रकरणाची पोलीस स्टेशनला माहिती न देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे सदर आरोपीने आज दि.8 रोजी पंचासमक्ष 3,000 रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी स्वतः स्वीकारली. सदर कारवाई विरवाडे ता.चोपडा येथे करण्यात आली.

याकामी पोलिस अधिक्षक सुनील कडासने ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, अप्पर पो.अधि. निलेश सोनवणे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील डीवायएसपी गोपाल ठाकूर, पी.आय. निलेश लोधी, पी.आय.संजोग बच्छाव, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख यांनी कर्तव्य बजावले. तपास संजोग बच्छाव पो.नि.ला.प्र.वि.जळगाव करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com