लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन ; दोन मॉलवर कारवाई
मनीष मॉलवर कारवाई करताना पथक

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन ; दोन मॉलवर कारवाई

दहा हजारांचा दंड, प्रशासनाच्या कारवाईने व्यवसायिक धास्तावले

भुसावळ - Bhusawal

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या दोन अस्थापनांवर कारवाई करुन प्रत्येकी पाच- पाच  हजार रुपयांचा दंड  वसुल करण्याची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यामुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्यात आठवडाभरापासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन झाला. त्यात नागरिकांनी चांगला पाठिंबा दिला. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरातील मनिष मॉल आणि जनता टॉवर या दुकानदारांनी दुकानांची ग्राहकांना दुकानात घेऊन शटर लावलेले होते.

मात्र दुकानात खरेदी सुरु असल्याच्या माहितीच्या आधारे पलिका व पोलिस प्रशासनाने या दुकानांची तपासणी केली असता दुकाने सुरु असल्याचे आढळून आल्यामुळे सदर दोन्ही अस्थापनांना प्रत्येकी ५-५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई आयपीएस आर्चित चांडक, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठच दीपक पाटील, ईश्‍वर भालेराव यांच्यासह पालिका कर्मचार्‍यांनी केली.


आठवडाभरात नागरिक व व्यवसायिकांना अस्घापने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी ही आही स्थापने उघडी दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात आवश्यक सेवां वगळता अस्थापने सुरु आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com